Tiranga Times Maharastra | Updated: 31 डिसेंबर 2025 | 10:30 AM
KDMC Election संदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाने मोठा राजकीय यश मिळवले आहे. निवडणूक प्रक्रियेची उत्सुकता शिगेला असताना भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यामुळे पक्षात आनंदाचं वातावरण आहे.
महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच भाजपच्या विजयाची नांदी झाली आहे. प्रभाग क्रमांक 26 (क) मधून भाजपच्या आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून रेखा राजन चौधरी यांनीही बिनविरोध विजय मिळवला आहे.
मतदानाआधीच विजयी घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका रेखा चौधरी यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले असून, विकासाला प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
